22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाखासदार शेवाळे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आणि निराधार!

खासदार शेवाळे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आणि निराधार!

Google News Follow

Related

शेवाळे यांच्या पत्नीने लिहिले पत्र

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे, असे स्पष्टीकरण खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी दिले आहे.

सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन ११ जुलै २०२२ रोजी सदर महिलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

एका तरुणीने खासदार शेवाळे यांच्यावर आरोप केले आहेत. शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्यावर कामिनी शेवाळे यांनी पत्र लिहून आपली बाजू मांडली.

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महिलेविरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे ८० दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

हे ही वाचा:

तडकाफडकी राजीनामा देणे ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक!

शिवसेना भवन नेमके कुणाचे?

राष्ट्रकुल स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंचा विश्वास पंतप्रधानांनी वाढविला!

आता सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, याचा आनंद!

 

प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा