AU या शब्दाचा अर्थ काय? सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे पुन्हा लक्ष्य

राहुल शेवाळेंनी लोकसभेत केला प्रश्न उपस्थित

AU या शब्दाचा अर्थ काय? सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे पुन्हा लक्ष्य

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित मुद्द्यामुळे पुन्हा राजकारण तापले आहे. राहुल शेवाळे यांनी सुशांत मृत्युप्रकरणात

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आज लोकसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत शेवाळे यांच्याकडून गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘एयू’ नावाने कॉल आले होते. ‘एयू’ म्हणजे आदित्य आणि उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयने चौकशी केली होती. पण अजूनही अनेक प्रश्नांचं उत्तरं लोकांना मिळालेली नाहीत “,असा सवाल राहुल शेवाळेंनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

भारत जोडो यात्रा पुढे ढकला…राहुल गांधींना पत्र

माथेरानमध्ये ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उपक्रम साईड ट्रॅकला

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

जुनी पेन्शन, अनुदान देतांना राज्याला विचार करावा लागेल

राहुल शेवाळे यांच्या कडून अनेक प्रश्न सुद्धा विचारण्यात आले. त्यात मुख्य प्रश्न असे होते. ” सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास आत्तापर्यंत कुठे पोहोचला आहे? या प्रकरणी सीबीआयकडे अंतिम उत्तर आहे का? सुशांतच्या शरीरावर इजा होण्याची चिन्हे आहेत का? सुशांत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यातील फोनवरील संभाषणाची चौकशी झाली आहे का? “. शेवाळे असेही म्हणाले की, बिहारला मध्यंतरी आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही भेटले होते. ते नेमके कशासाठी, याचाही काहीतरी छडा लागला पाहिजे.

“या प्रकरणात AU हे नाव पुढे आले आहे. रिया चक्रवर्तीला एकाच नंबरवर ४४ फोन आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, AU ही अनन्या उधास आहे असे म्हटले जात आहे पण बिहार पोलिसांच्या तपासानुसार आदित्य आणि उद्धव यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,  अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. आदित्य ठाकरे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली मात्र त्यांनी या मुद्द्याला स्पर्शही न करता राज्य सरकार कसे बेकायदा, घटनाबाह्य आहे असा नेहमीचाच आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याच्या होत असलेल्या आरोपातून लक्ष विचलित व्हावे म्हणून हे आरोप केले जात आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी वेळ निभावून नेली.

Exit mobile version