उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!

९ आरोपी ताब्यात

उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!

मध्य प्रदेशात सट्टेबाजीविरोधात उज्जैन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा, सायबर टीम, नीलगंगा आणि खारकुना पोलिसांनी ऑनलाइन बेटिंगमध्ये गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४१ मोबाईल फोन, १९ लॅपटॉप, ५ मॅक-मिनी, १ आयपॅड, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिम, २ पेन ड्राईव्ह, ३ मेमरी कार्ड आणि इतर वस्तूंसह १४.५८ कोटी रुपये जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.

पुलिस महानिरीक्षक संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही लोक अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचाही शोध सुरु आहे.

हे ही वाचा..

घुसखोर बांगलादेशींना हुडकून हाकलून लावा

पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!

पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार?

कुवेतमधील ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले, अग्निकांडात गमावला होता जीव!

कारवाईमध्ये विदेशी चलनही जप्त करण्यात आले. याशिवाय १४ कोटी ६० लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून अन्य काही लोकांचा यामध्ये समावेश आहे का, याचाही तपास घेतला जात आहे.

Exit mobile version