भरधाव दुचाकीची १६ वर्षीय मुलीला धडक; बसनेही चिरडले

गोंधळाचा फायदा घेऊन तिला धडक देणारा दुचाकीस्वार पळाला

भरधाव दुचाकीची १६ वर्षीय मुलीला धडक; बसनेही चिरडले

भरधाव दुचाकीने एका १६ वर्षीय मुलीला धडक दिल्याने ही मुलगी बसखाली चिरडली गेल्याची दुर्घटना सोमवारी मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकाजवळ घडली. ही मुलगी वडाळ्यातील एनकेईएस कॉलेजमध्ये कॉलजेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ही मुलगी बसखाली आल्याचे बसचालकाला समजलेच नाही. आजूबाजूच्या प्रवाशांनी याबाबत बसचालकाला सांगताच चालकाने लगेचच बस थांबवली. मात्र गोंधळाचा फायदा घेऊन तिला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पोबारा केला.

 

या १६ वर्षीय मुलीचे नाव रिया गुप्ता असल्याचे तिच्या कॉलेजच्या ओळखपत्रावरून आढळून आले आहे. ती अँटॉप हिल येथील संगम नगर येथील रहिवासी होती. ही दुर्घटना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उड्डाणपुलावर घडली. रियाचे वडील विजय यांनी दुचाकीस्वारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

हे ही वाचा:

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार

ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास

‘अशाप्रकारे बेदरकार बाइक चालवून माझ्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. आज माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे, उद्या आणखी कोणाचा होईल. पोलिसांनी त्याला पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे,’ अशी मागणी या पित्याने केली.

 

रिया कॉलेजमधून घरी जात असताना हा अपघात झाला. ती रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने तिला धडक दिली. त्यामुळे ती काही अंतरावर फेकली गेली आणि बेस्टच्या मिनी बसच्या मागच्या चाकाखाली आली. पादचाऱ्यांनी तातडीने तिला केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माटुंगा पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी बेस्टचालक अहमद मिर्झा यांचाही जबाब नोंदवून त्यांना पाठवून दिले आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी आता वडाळा पुलाच्या दिशेने जाणाऱ्या सीसीटीव्हींची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version