पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

पुणे अपघातप्रकरणी रोज नव्याने खुलासे होत असताना आता या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. अखेर पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आहे. त्यांना आता न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.

अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या आईने रक्त दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलीस अल्पवयीन मुलाचीही चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे.

तसेच पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ससूनमध्ये रक्त नमुन्यात फेरफार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नागपूरमध्ये तापमान ५६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेच नाही

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार चालवली. भरधाव वेगात जात असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन असल्याने आरोपीला १५ तासाच्या आत जामीन देखील मिळाला. हे प्रकरण चांगलंच तापलं आणि पुढील कारवाईला वेग आला.

Exit mobile version