‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

संतप्त आईने केली विनंती, मृत्यूच्या दोन मिनिटे आदित्य आईशी बोलला होता

‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा त्याच्या अंधेरीतील घरामध्ये बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला. मात्र ही घटना घडण्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्याने आई उषा यांच्याशी फोनवरून संभाषण केले होते, असे उघडकीस आले आहे.

या संभाषणात आदित्यने त्याच्या प्रकृतीचा कोणताही उल्लेख केला नव्हता, असे त्यांनी सांगितले. मात्र अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आदित्यच्या आई संतप्त झाल्या होत्या.

मंगळवारी सिद्धार्थ रुग्णालयाच्या आदित्यचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे कारण न्यायवैद्यक विश्लेषणासाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे. कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम सेंटरमधील चार डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. त्याचे व्हिडीओचित्रिकरणही करण्यात आले.

हे ही वाचा:

निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा

परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष…

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’  

उषा यांनी सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आदित्यला फोन केला होता. उषा यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील त्यांचे पूर्वीचे चॅट डिलीट झाले होते. याबाबत तांत्रिक माहिती नसल्याने आदित्यने त्यांना पिंग करावे, असे त्याच्या आईने त्याला सांगितले होते.

त्यानंतर आदित्यने तिला ‘मम्मा’ असा संदेश पाठवून हृदयाचा इमोजी पाठवला. दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी आदित्यने तिला मेसेजिंग ऍपच्या काही समस्यांबद्दल एक व्हॉइस नोटही पाठवली. ‘मी त्याचा ऐकलेला हा शेवटचा संवाद. त्यानंतर मला त्याच्या मृत्यूबाबत त्याच दिवशी उशिरा कळले,’ असे उषा म्हणाल्या. या घटनेचा त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला.

त्यांना सुटकेस भरण्याची आणि मुंबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक करण्याचीही ताकद उरली नव्हती. यासाठी त्यांना शेजाऱ्यांकडे मदत मागावी लागली. निवृत्त सरकारी कर्मचारी असणाऱ्या उषा दिल्लीत एकट्याच राहतात. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील असलेल्या त्यांच्या पतीचे ११ वर्षांपूर्वी निधन झाले. आदित्यची बहीण अमेरिकेमध्ये राहते आणि बुधवारी ती मुंबईत येईल.

आदित्यने अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याचे वृत्त आल्याने उषा संतापल्या होत्या. ‘मला या संदर्भात माझ्या ओळखीच्या व्यक्तींचे अनेक कॉल आले होते. हे अजिबात खरे नाही. न्यूज पोर्टलने अशा चुकीच्या बातम्या मागे घ्याव्यात आणि माझ्या मुलाची बदनामी करणे थांबवावे,’ असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version