28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाएलआयसीला गंडविण्यासाठी आईने चक्क हे पाऊल उचलले!

एलआयसीला गंडविण्यासाठी आईने चक्क हे पाऊल उचलले!

पोलिसांनी केली कारवाई

Google News Follow

Related

भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) दोन कोटीच्या विम्याचा दावा करणाऱ्या आई आणि मुलाचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणी दादर येथील एलआयसी कार्यालयाकडून आई आणि मुलाच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

मुलगा दिनेश टाकसाळे आणि आई नंदाबाई टाकसाळे असे आई आणि मुलाचे नाव आहे. २०१५ साली दिनेश टाकसाळे याने दादर येथील एलआयसी कार्यालयात स्वतःचा २ कोटी रुपयांचा विमा काढण्यासाठी अर्ज केला होता, तो अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी असून त्याचे शेतीमध्ये वार्षिक उत्पन्न ३८ लाख रुपये आहे आणि तो कँटीन देखील चालवत आहे. त्याचे उत्पन्न लाखाच्या घरात असल्याचा दावा दिनेश याने अर्जात केला होता. त्याने या संबधीचे सर्व कागदपत्रे एलआयसी कार्यालयात सादर केली होती.

यानंतर, एलआयसीने त्याला २ कोटी रुपयांची पॉलिसी ऑफर केली. त्यानंतर, दिनेशने तीन महिन्यांसाठी सुमारे १ लाख रुपये प्रीमियम भरला. त्यानंतर, त्याने प्रीमियम भरणे बंद केले, असे पोलिसांनी सांगितले. “जवळपास दीड वर्षानंतर, २०१६ च्या दिनेशची आई नंदाबाई हिने एलआयसी कार्यालय येथे संपर्क साधून मुलाचा अहमदनगर येथे अपघाती मृत्यू झाला असल्याचे कागदपत्रे सादर केले होते.तिने सादर केलेल्या कागदपत्रात मुलाचे मृत्यूचे प्रमाणपत्र जोडले होते व २ कोटीच्या विमा साठी एलआयसीकडे दावा केला होता.

हे ही वाचा:

नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच… MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

 

एलआयसी विभागाकडून कागदपत्रे तपासात असताना अधिकारी यांना संशय येताच त्यांनी प्रत्यक्षात अहमदनगर येथे जाऊन अपघाताची चौकशी सुरू केली. या चौकशीत दिनेश टाकसाळे याचा मृत्यू झालेला नसून तो जिवंत असल्याचे समोर आले.
तसेच नंदाबाई टाकसाळे यांनी सादर केलेले मुलाचे मृत्यूपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एलआयसीच्या दादर कार्यलाच्या शाखा व्यवस्थापक यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तवेज तयार करणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा