24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाविजेच्या तारेवर कपडे वाळत घालण्याच्या नादात तिघे धक्क्याने मृत्युमुखी

विजेच्या तारेवर कपडे वाळत घालण्याच्या नादात तिघे धक्क्याने मृत्युमुखी

एक व्यक्ती धातूच्या तारेवर कपडे सुकवत असताना ही दुर्घटना घडली. त्याच्या मदतीला धावलेली त्याची सासू आणि पत्नीही गंभीर जखमी झाल्या.

Google News Follow

Related

कोलकात्याच्या इक्बालपूर भागात रविवारी एक विचित्र घटना घडली. एकाच कुटुंबातील तीन जण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. रविवारी पहाटे ही घटना घडली. विद्युत केबलवर एक व्यक्ती कपडे सुकवत असताना हा अपघात झाला.

त्या व्यक्तीला विजेचा शॉक लागल्याने त्याची पत्नी आणि सासू मदतीला धावून आली. पण त्या दोघींनाही विजेचा धक्का बसला. विजेच्या तारेशी संपर्क आल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तिघांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून आई आणि मुलीला मृत घोषित केले.तर दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीला जास्त प्रमाणात इजा झाल्याने त्याचाही मृत्यू झाला.

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव इझार अख्तर असे आहे. मृत इझार अख्तर हा त्याचे ओले कपडे सुकवत असताना भिंतीला चिकटलेल्या धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्याने त्याला शॉक लागला. इझार अख्तरला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची सासू आणि त्याची पत्नी याना शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

‘पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याची कहाणीही दाखवा’

“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”

दंगल घडविण्यामागे कुणाची तरी फूस, आम्ही अद्दल घडवू!

परीक्षेत नापास झाल्यामुळे तिने अपहरणाचे नाट्य रचले!

इझार अख्तर, मुन्ताहा बेगम आणि खैरुल नेसा अशी मृतांची नावे आहेत. स्थानिकांशी या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, मृत व्यक्तीच्या घराशेजारी एक अरुंद गल्ली आहे. त्याच्या घरासमोरील मोकळ्या जागेवरून विजेच्या तारा गेल्या आहेत. दरम्यान, मृत व्यक्ती ओले कपडे वाळत घालत असताना त्याचा विजेच्या तारेशी संपर्क आल्याने ही दुर्घटना घडली असावी. घडलेल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम घटनास्थळी गेले. त्यांनी जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

ते म्हणाले, भविष्यात ही घटना पुन्हा घडू नये हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याने सर्वानी आपली काळजी घ्यावी. या घटनेनंतर, कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन (CESC) लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी अपघाताची केबल तपासण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी भेट दिली असून पुढील तपास करत आहोत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा