सांताक्रूझमधील व्ही.एन. देसाई रुग्णालयात प्रसुतीनंतर आई आणि नवजात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आई आणि मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबिय, नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून त्यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरीतील सात बंगला परिसरात राहात असलेल्या डॉ. मेहीका शेट्टी (३२) या बालरोगतज्ञ असून त्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी वाकोला पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ नोव्हेंबरला अर्चना यांची स्त्रीरोग तज्ञ डॉ. निकीता आणि डॉ. नंदन यांच्या उपस्थितीत ईमर्जन्सी सेक्शन करण्यात आली. यावेळी डॉ. मेहीका तेथे उपस्थित होत्या. सिझरींग दरम्यान अर्चना यांच्या गर्भात असलेल्या बाळाचा हार्ट रेट कमी होत चालला होता.
हे ही वाचा:
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
दिल्लीच्या हवेत सुधारणा नाहीच; उत्तर प्रदेशसह पंजाब, आसाममध्येही दाट धुके
पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण
हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!
बाळ जन्माला आले तेव्हापासून त्याचा हार्टरेट झिरो होता. बाळ जन्माला आल्यापासुन रडले नाही. त्यामुळे बाळाला तातडीने एनआयसीयूमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. हार्ट रेट झिरो असल्यामुळे बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधार होत नव्हता. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना वेळोवेळी तोंडी आणि लेखी अपडेट दिले गेले. उपचारांदरम्यान आई अर्चनानंतर ११ नोव्हेंबरच्या सकाळी बाळाचाही मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी अर्चनाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. बाळाचा मृतदेह घेऊन न जाता नातेवाईकांनी रुग्णालयात गोधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच, २० ते २५ जणांनी मेडीकल सुपरिंटेन्डट यांना घेराव घालुन त्यांनाही धक्का बुक्की व शिवीगाळ करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचे डॉ. मेहीका यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.