पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांची कारवाई; एएनआयने जाहीर केले होते तीन लाखांचे बक्षीस

पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा (इसिस) दहशतवादी रिझवान अली याला बेड्या ठोकल्या आहेत. राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने म्हणजेच एनआयएने त्‍याच्‍यावर तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो दिल्‍लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. रिझवान हा पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित होता.

दिल्ली पोलिसांना इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात यश मिळाले असून पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे. रिझवान हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होता. पुणे आयएसआयएस मॉड्यूलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.

हे ही वाचा:

हॉकीत जिंकलो; भारताला चौथे कांस्य !

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर !

विनेशचे काका महावीर फोगाटनी काँग्रेसला केले चितपट

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर!

शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे. रिझवानच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेल्यापासून फरार होता. अखेर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएने पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात एकूण ११ आरोपींवर आरोप ठेवले आहेत. हे प्रकरण पुण्यातील इसिसशी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे.

Exit mobile version