सोशल मीडियावरील मित्रांकडून मुंबईत सर्वाधिक बलात्कार

सोशल मीडियावरील मित्रांकडून मुंबईत सर्वाधिक बलात्कार

मुंबई शहरात २०१९ ते २०२१ या तीन वर्षात अडीच हजाराहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडिया वरून ओळख झालेल्या तरुणांकडून सर्वाधिक बलात्कार घडल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलीसांच्या वार्षिक अहवालातून समोर आली असून यामध्ये अल्पवयीन मुलींचे अधिक प्रमाण आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली तेव्हा ही बाब उघड झाली आहे.

पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी संबोधित केलेल्या बैठकीत लॉकडाऊन आणि निर्बंधांदरम्यानच्या गुन्ह्यांची माहिती दाखवण्यात आली. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मागील तीन वर्षांत दोन हजार ६६९ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. ज्यात २०२१ मध्ये ८८८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की लैंगिक गुन्हेगार पीडितांना ओळखत होते. गुन्हेगारांमध्ये पालक, नातेवाईक, लग्नाचे आमिष दाखविणारे सोशल मीडिया मित्र, लिव्ह-इन पार्टनर, वेगळे झालेले पती, शेजारी, सहकारी, नोकर, माळी, ड्रायव्हर इत्यादींचा समावेश आहे. मात्र सोशल मीडिया मित्र गुन्हेगारांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.

हे ही वाचा:

‘यूपी-बिहार वाले भैया’ या चन्नी यांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल..

चिंचपोकळीची पानसरे इमारत कोसळायला आली तरी आमदार निधीतून विटांचे बांधकाम

अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

गेल्या तीन वर्षांत POCSO कायद्यांतर्गत ८५६ गुन्ह्यांसह एक हजार ५०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केलेले अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना तरुणींना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अहवाल जाहीर केला आहे. यावेळी सहआयुक्त मिलिंद भारांबे,विश्वास नांगरे पाटील,निकेत कौशिक ,राजकुमार व्हटकर यांच्यासह पाच अप्पर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त हजार होते.

Exit mobile version