मुंबईत कोरोना काळातून पूर्व पदावर येत नाही तोच पावसाळी साथीच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कावीळ सारख्या आजारांनी साथ पसरण्याची शक्यता जास्त असते. ह्यासाठी मुंबई महानगर पालिकेने ठिकठिकाणी डासांच्या अळ्यांची शोध मोहीम चालू केली. या मोहिमेदरम्यान दादर, माटुंगा, शीव व माहीम स्थानकाच्या शेडवरील पन्हाळीत साचलेल्या पाण्यात अळ्या सापडल्याचे आढळून आले. तातडीने पालिकेच्या कीटकनाशक विभागाने फवारणी सुरु केली.
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने साथीच्या आजारांनची सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणूनच डेंग्यू, मलेरिया, कॉलरा ह्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शोधमोहीम दरम्यान रेल्वेस्थानकांच्या पन्हाळी मध्ये २१ ठिकाणी ‘ऍनाफिलीस’ डासांच्या अळ्या आढळून आल्या.
हे ही वाचा:
अमरनाथ यात्रेत ३ दिवसात ६ जणांचा मृत्यू
विक्रोळी – कांजूरमार्ग परिसरात रिक्षावाल्याने तरुणाला लुटले!
राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार
आगकाडी पेटविली आणि डोंबिवलीत झाला गॅस सिलिंडरचा स्फोट
इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, गच्चीवर अडगळीचे सामान, झोपडपट्टी मधील पाण्याचे ड्रम, प्लास्टिक ताडपत्रींमध्ये साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे आदींची तपासणी करण्यात आली. शोधमोहीमे दरम्यान सापडलेल्या अळ्यांचे उत्पत्तीस्थळे स्थान नष्ट करण्यात येतात. किंवा कीटक नाशकांची फवारणी केली जाते.
मोहिमे दरम्यान कीटकनाशक विभागाने ४५ लाख ३७ हजार २४७ ठिकाणी पाहणी केली. ह्यामध्ये १८ हजार ठिकाणी ‘एडिस’ जातीच्या अळ्या सापडल्या असून मलेरिया ‘ऍनाफिलीस’ जातीच्या दोंन हजार २१४ उत्त्पत्तीस्थाने आढळली. २६ हजार ४३७ वस्तू पालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरात, कार्यालयात आणि परिसरात पाणी साचू शकतील अशा ठिकाणी तात्काळ नष्ट करावीत, याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन पालिकेने केले आहे.