नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

ठाणे पोलीस आणि निवडणूक आयोगाची संयुक्त कारवाई

नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यावात्षा व्यवस्था तैनात केली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची कठोरपणे तपासणी करण्यात येत असून अनेक ठिकाणांहून रोकड, मौल्यवान धातू, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अशातच ठाणे पोलिसांनी नवी मुंबईत मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ठाणे पोलीस आणि निवडणूक आयोग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये नवी मुंबईमधून मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाचं ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर १६ मध्ये ही मोठी कारवाई केली आहे. नेरूळमधील एका रो- हाऊसमधून सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान

राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…

आदिवासी मुलींशी लग्न करणाऱ्या घुसखोरांना आता जमीन मिळणार नाही!

बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणूक आयोग आणि ठाणे पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ही रोकड जप्त करण्यात आली आहे. सीनियर इन्स्पेक्टर ब्रम्हानंद नायकवडी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही एका रो- हाऊसमधून रोख जप्त केली आहे. साधारण अडीच कोटी रुपयांची ही रोकड आहे. ही जप्त केलेली रोकड कोणाची आहे आणि नवी मुंबईत कुठून आली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही रक्कम जप्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्यात प्रचार कार्याला वेग आला आहे.

Exit mobile version