26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुंबई विमानतळावर जप्त केले ३ कोटीचे जिवंत विदेशी प्राणी

मुंबई विमानतळावर जप्त केले ३ कोटीचे जिवंत विदेशी प्राणी

प्राणी मलेशियातून मुंबईत तस्करी करण्यात आले होते

Google News Follow

Related

महसूल गुप्तचर संचालनालयाने सुमारे २.९ कोटी रुपये किमतीचे जिवंत विदेशी प्राणी मुंबई विमानतळावर जप्त केले आहेत . जे एक्वैरियम फिशच्या नावाखाली हे प्राणी मलेशियातून मुंबईत तस्करी करण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

व्हिक्टर लोबो (३६,) आणि इमॅनवेल राजा (३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.एक्वैरियम फिशच्या नावाखाली जिवंत विदेशी प्राण्यांची एक खेप मलेशियाहून एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये येणार असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळालेली होती. डीआरआयचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कळले की कस्टमने मालाची खेप उतरवली आहे आणि ती राजा यांना मिळाली आहे. त्यानंतर अधिकार्‍यांनी माल ज्या वाहनात होता त्याचा क्रमांक घेतला आणि विलेपार्ले उड्डाणपुलावर तो अडवला.

तपासणीदरम्यान ३० पाकिटे उतरविण्यात आली. यामध्ये शोभिवंत मासे , सरपटणारे प्राणी आणि कासव, कासव, अजगर, सरडे, यांसारख्या वन्य प्राण्यांसह एकूण ६६५ प्राणी होते. ५४८ पैकी ११७ प्राणी मृतावस्थेत आढळले. त्यानंतर वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

हे ही वाचा:

धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

चौकशीदरम्यान, गुप्तचर खात्याला लोबोची माहिती मिळाली. तो राजाकडून आयात केलेल्या जनावरांची डिलिव्हरी घेणार होता. गुप्तचर खात्याने राजा यांचाही जबाब नोंदवला, त्याने माल आयात केल्याचे मान्य केले. दोन्ही आरोपींचे बचाव पक्षाचे वकील सुजय कांतावाला यांनी असे सादर केले की त्यांच्या ग्राहकांना ६ ऑक्टोबरपासून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले होते, तर डीआरआयने ८ ऑक्टोबर रोजी माल जप्त केला होता. न्यायालयाने दोघांना १५हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा