दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शाळांना ई- मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली असून धमकी देणाऱ्याने ३० हजार डॉलर्सची खंडणी मागितली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवार, ९ डिसेंबर रोजी दिली. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास बॉम्बचा स्फोट केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आल्या आहेत.
“मी शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय योग्य पद्धतीने लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, पण बॉम्बचा स्फोट झाल्यास अनेक जण जखमी होतील. जर मला ३०,००० डॉलर मिळाले नाहीत तर मी बॉम्बस्फोट करीन,” असं धमकी देणाऱ्याने ईमेलमध्ये म्हटलं आहे.
Over 40 Delhi schools get bomb threats via e-mail, demands ransom of USD 30,000
Read @ANI Story |https://t.co/5qtrHxpNtu#bombthreat #school #Delhi pic.twitter.com/SL0rFbnzvR
— ANI Digital (@ani_digital) December 9, 2024
दिल्लीतील शाळांना रविवार, ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३८ च्या सुमारास मेल आला. आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह ४० शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. पुढे कारवाई होईपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी पोहोचली होती. मात्र, धमकीच्या मेलनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ मुलांना घरी पाठवून पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांत शाळांना अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. मात्र, त्यानंतर अफवा असल्याचे समोर आलं होतं.
हे ही वाचा :
मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!
पंजाब-हरियाणा सीमेवरून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाला रोखले
अलीकडच्या काही महिन्यांत अनेक भारतीय विमान कंपन्या, हॉटेल्स, रेल्वे स्थानकांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. पुढे तपासाअंती त्या सर्व फसव्या ठरल्या आहेत. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विमान कंपन्यांना फसव्या धमकीच्या कॉलची संख्या २०२३ मध्ये १२२ वरून २०२४ मध्ये ९९४ पर्यंत वाढली आहे. एकट्या ऑक्टोबरमध्ये, विमान कंपन्यांना ६६६ बॉम्बच्या धमकीचे कॉल आले होते जे या वर्षातील सर्वाधिक होते. त्यानंतर जूनमध्ये १२२ धमक्या आल्या. याउलट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये केवळ १५ धमकीचे कॉल रेकॉर्ड केले गेले, जे गेल्या वर्षी सर्वाधिक होते.