दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

दिल्ली पोलिसांकडून विविध जिल्ह्यांमध्ये कारवाई

दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

देशभरात घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून विविध राज्यांमध्ये त्यांना हुसकावण्यासाठी कारवाई केली जात आहे. दिल्ली पोलिसांनीही ही मोहीम हाती घेतली असून मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. माहितीनुसार, आग्नेय आणि दक्षिण दिल्ली जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाई दरम्यान ही अटक करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिएल्ल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या व्यक्तींनी वैध कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केला होता. याचं आधारे ते भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. कारवाईदरम्यान, त्यांच्या ताब्यातून अनेक संशयास्पद कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मंगळवारी पोलिसांनी दिल्लीच्या बाहेरील भागात राहणाऱ्या तीन अनधिकृत बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेतल्यानंतर हे घडले. “विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून, हद्दपारीनंतर बेकायदेशीरपणे भारतात पुन्हा प्रवेश केल्याबद्दल परदेशी सेलने अलीकडेच तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली,” असे उपायुक्त (बाह्य) सचिन शर्मा यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस आयुक्तांनी सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अनधिकृत स्थलांतराशी संबंधित बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार हा उपक्रम राबवला जात आहे.

१० मार्च रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकांनी पीव्हीसी मार्केट मुंडका, बाबा हरिदास कॉलनी, सुलतान पुरी, बेनिवाल लोहा मंडी, इंद्र झील आणि हनुमान मंदिर कमरुद्दीन नगर यासह अनेक भागात छापे टाकले, असे डीसीपी म्हणाले. जानेवारीमध्ये, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्ली पोलिसांना राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटविण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, एका मोठ्या कारवाईत, दिल्ली पोलिसांनी एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला होता. ही टोळी बेकायदेशीर परदेशी रहिवाशांना, विशेषतः बांगलादेशींना, सरकारी ओळखपत्र मिळवण्यास आणि भारतात बेकायदेशीरपणे राहण्यास मदत करत होती. या प्रकरणात किमान १२ जणांना अटक करण्यात आली आणि अनेक बांगलादेशींना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले.

हे ही वाचा : 

‘खोक्या’ला बेड्या!

३० दिवसांच्या युद्धबंदी कराराला युक्रेनची सहमती; रशिया काय निर्णय घेणार?

डलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो

जाफर एक्सप्रेस अपहरण: १६ अपहरणकर्त्यांचा खात्मा; १०४ प्रवाशांची सुटका

दरम्यान, ११ मार्च रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ सादर केले. या विधेयकाचा उद्देश भारताच्या इमिग्रेशन कायद्यांचे आधुनिकीकरण आणि एकत्रीकरण करणे आहे. हे विधेयक केंद्र सरकारला भारतात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रांची आवश्यकता आणि व्हिसा आणि नोंदणीची आवश्यकता यासह परदेशी लोकांशी संबंधित बाबींचे नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी काही अधिकार देते.

राज ठाकरेंचा 'सेल्फ गोल' | Mahesh Vichare | Raj Thackeray | Mahakumbh 2025 |

Exit mobile version