दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई

दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स आणि युट्युब आधारित न्यूज चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. या साईट्स आणि चॅनल्सचा वापर भारताविरुद्ध मजकूर तयार आणि पोस्ट करण्यासाठी केला जात होता. माहिती तंत्रज्ञान (IT) कलम ६९ अ चे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

माहितीनुसार, २०२१ पासून भारताविरुद्ध मजकूर बनवल्याबद्दल १५० हून अधिक वेब साईट्स आणि युट्युब न्यूज चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. बंदी घातलेल्या चॅनेलच्या यादीत न्यूज विथ फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन हब, फ्लॅश नाऊ, मेरा पाकिस्तान आणि अपनी दुनिया टीव्ही यांचा समावेश आहे.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी बनवलेल्या नवीन आयटी नियमांनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या युट्युब चॅनेलला प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२२ दरम्यान ७८ युट्युब न्यूज चॅनेल आणि ५६० यूट्यूब लिंक्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. जानेवारी २०२२ मध्ये, केंद्राने ३५ पाकिस्तान आधारित युट्युब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. या चॅनलच्या माध्यमातून डिजिटल मीडियावर भारताविरूद्ध खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते.

हे ही वाचा:

… म्हणून शुभमन गिलला भरावा लागणार दंड!

रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

फेडरर, नदालला पराभूत करण्यासाठी काय करावे लागेल, याचा सतत विचार केला!

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

सोशल मीडिया अकाउंटवर कट रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करून खोट्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Exit mobile version