बापरे!! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज ११ हजार वाहने टोल देतच नाहीत!

बापरे!! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज ११ हजार वाहने टोल देतच नाहीत!

मुंबई एक्स्प्रेस वे वरुन दररोज तब्बल ११ हजार वाहने टोल न देता प्रवास करत असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून त्यांच्या वेबसाईटवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे टोलमध्ये घोटाळा केला जात असल्याच्या दाव्याला दुजोरा मिळत आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्तांकडे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वरुन दररोज किती वाहने प्रवास करतात याची माहिती जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माहिती आयुक्तांच्या निर्देशांनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यातून टोल न भरणाऱ्या वाहनांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दररोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

टोल न देता प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये ज्यांना सुट आहे (exempt) आणि टोल चुकवून जाणारी (violeters) अशा वाहनांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, दोन्हीमधील वाहनांची वेगवेगळी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

विनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

टोल मधून सुट आहे अशी खासदार, आमदार, पोलीस, रुग्णवाहिका, मिलीटरी वाहने अशी दररोज दहा हजार वाहने एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत असतील अशी शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून देण्यात आलेली ही आकडेवारी संशयास्पद असल्याचा आरोप विवेक वेलणकर यांनी केला आहे.

विवेक वेलणकर यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. तसेच कंत्राटदाराने सुट असलेल्या वाहनांची संख्या आणि टोल चुकवून गेलेल्या वाहनांची संख्या वेगवेगळी जाहीर करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्यावे. तसेच आता आलेल्या आकडेवारीची चौकशी करावी, असे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version