सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी दीपक टिनूच्या प्रेयसीला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी ही अटक केली. ती मुंबईहून मालदीवला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही अटक करण्यात आली आहे .
काही आठवड्यांपूर्वी दीपक टिनू पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला आश्रय दिल्याच्या आणि पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. टिनूच्या मैत्रिणीची चौकशी करून फरार टिनूला पकडण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने दीपकला मानसातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयए) ताब्यातून पळून जाण्यास मदत केली. दीपक टिनू हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक आहे.
टिनू गेल्या आठवड्यात मानसा जिल्ह्यातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. त्याच्या मैत्रिणीने त्याला पळून जाण्यास मदत केली. ती १० ऑक्टोबर रोजी विमानाने मुंबईहून मालदीवला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली.या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांचे एक पथक मुंबईत पोहोचले आणि त्यांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
जुलैमध्ये गोइंदवाल साहिब कारागृहात गुंड प्रीतपाल सिंगला विश्वासात घेतल्यानंतर टिनूच्या पळून जाण्याचा डाव सुरू झाला असा खुलासा महिलेने केला असल्याचे या प्रकरणात असे सांगितले जात आहे. टिनूच्या कथित प्रेयसीने असाही दावा केला आहे की “मनसा पोलिसांनी तिला वारंवार प्रॉडक्शन वॉरंटवर आणण्याचा कट रचला होता.” दीपक टिनूवर मूसवाला खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.