‘उडता’ पंजाब, मुसेवाला हत्याकांडातील आरोपी फरार

‘उडता’ पंजाब, मुसेवाला हत्याकांडातील आरोपी फरार

पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर दीपक टिनू हा मानसा जिल्ह्यातून पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. यामुळे पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या दीपक टिनूला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

२९ मे रोजी सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची योजना लॉरेन्स बिश्नोईसोबत दीपक टिनू याने केली होती, असे म्हटले जाते. मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये दीपक टिनूचाही समावेश असल्याचे  सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली असून, चकमकीत दोघांचा मृत्यू झाला आहे. मूसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोई टोळीचा सदस्य गोल्डी ब्रार याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. दीपक टिनू याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट

प्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता

फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

शनिवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री दीपक टिनू हा फरार झाला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसा सीआयए स्टाफची टीम त्याला कपूरथला जेलमधून रिमांडवर आणत होती. यावेळी पोलिसांच्या पथकाला चकवा देऊन तो पळून गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मूसवाला यांच्या हत्येचा सौदा एक कोटी रुपयांना झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शार्प शूटरला पाच लाख रुपये मिळाले होते.

Exit mobile version