मुंबई मोनोरेल मध्ये हाऊसकीपिंगचे कंत्राट चालवणाऱ्या कंत्राटदाराकडे कामाच्या बिलाची फाईल रिलीज करण्यासाठी २० लाखाची लाच मगितल्याप्रकरणी मोनोरेल चे चीफ ऑपरेटिंग अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडून दाखल करण्यात आला आहे.
डॉ. डी. एल. एन.मूर्ती असे मुंबई मोनोरेल चे चीफ ऑपरेटिंग अधिकाऱ्याचे नाव आहे. मुंबई मोनोरेल मध्ये ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या कंपनीला २०१९ ते २०२० मध्ये साफसफाई आणि हाऊसकिपिंग चे कंत्राट मिळाले होते. या कंपनीने सदरचे काम कंत्राटप्रमाणे ऑगस्ट २०२०मध्ये पूर्ण झाले.
कंपनीच्या कामाचे बिल एकूण दोन कोटी ५० लाख आणि सिक्युरिटी रक्कम ३२ लाख रुपये झाले होते. त्यापैकी मुंबई मोनोरेलकडून दोन कोटी १० लाखाचे बिल आणि सिक्युरिटी रक्कम पैकी २२ लाख जून २०२१ मध्ये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम मिळण्यासाठीची फाईल मोनोरेल चे चीफ ऑपरेटिंग अधिकारी डॉ. डी. एल. एन.मूर्ती यांनी स्वतःजवळ ठेवून फाईल पुढे पाठवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’कंपनीचे मालकाकडे मागितली होती.
या प्रकरणी कंपनीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपासात डॉ. डी. एल. एन.मूर्ती यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
पालकच म्हणू लागले शाळा सुरू करा!
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. डी. एल. एन.मूर्ती यांच्याविरुद्ध सोमवारी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.