कुत्र्यांच्या २५० पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?

कुत्र्यांच्या २५० पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या लवुळ गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या एक महिन्यापासून लवुळ गावात काही माकडांनी धुमाकूळ घातला आहे. गावात कुत्र्याचे पिल्लू दिसले की, ही माकडे त्याला उचलून उंच झाडावरून किंवा घराच्या छतावरून खाली फेकत असल्याच्या विचित्र आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या माकडांनी गेल्या महिन्याभरात गावातील सुमारे २५० कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव घेतला आहे. माकडांच्या या धक्कादायक वर्तणुकीमुळे गावकरी दहशतीत जगत आहेत.

बीडमधील माजलगाव तालुक्यापासून १० किमी अंतरावर लवुळ नावाचे गाव आहे. या गावात मागील एक महिन्यापासून काही माकडे कुत्र्यांची पिल्ले उचलून नेत आहेत. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच झाडावर किंवा घराच्या छतावर घेऊन जात त्यांना खाली ढकलून दिले जात आहे. या माकडांनी आतापर्यंत गावातील तब्बल २५० कुत्र्यांच्या पिल्लांना उंचावरून फेकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

‘विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो’

धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज

‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर

श्रीनगरमध्ये लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी गावातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिल्लावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. तेव्हा पासून ही माकडे सूड भावनेने पेटली असून बदला घेण्यासाठी त्यांनी गावातील २५० कुत्र्यांची पिल्ले मारल्याची चर्चा गावात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर या माकडांना पकडले असून त्यांना औरंगाबाद येथील गौताळा वन्यजीव अभयारण्यात सोडल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

Exit mobile version