जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन

जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिनला अंतरिम जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्रीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुकेश चंद्रशेखरने यांनी विविध मॉडेल्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर सुमारे २० कोटी रुपये खर्च केले आहेत. काही सेलिब्रिटींनी त्याच्याकडून भेटी स्वीकारण्यास नकार दिला होता.
सुकेश चंद्रशेखर यांनी दिलेल्या भेटवस्तूंच्या संदर्भात आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिनची चौकशी केली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंदर मलिक यांनी जामीन याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले. तोपर्यंत तिचा नियमित जामीन कोर्टात प्रलंबित आहे… जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून कोर्टाने जॅकलिनला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.३१ ऑगस्ट रोजी पूर्ववर्ती न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली आणि फर्नांडिस यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.

हे ही वाचा:

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर

नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

तपासासंदर्भात ईडीने अनेकवेळा समन्स बजावलेल्या फर्नांडिस यांना पुरवणी आरोपपत्रात प्रथमच आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. तिने दिल्ली पोलिसांना सुकेशकडून मिळालेल्या वस्तूंची यादी देखील दिली, ज्या कथितपणे त्याने तुरुंगात असलेल्या रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांच्याकडून खंडणीसाठी घेतलेल्या पैशातून खरेदी केल्या होत्या असे म्हटले जाते.

यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी जॅकलिन या प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूसमोर हजर झाली होती. तिचा सामना पिंकी इराणीशी झाला, ज्याने अभिनेत्याची सुकेशशी ओळख करून दिली होती.

Exit mobile version