बांगलादेशात रवानगी करण्यात आलेला घुसखोर १४ वर्षानंतर बिहारमध्ये सापडला!

सुरक्षा दलांकडून घुसखोर बांगलादेशी मोल्ला रफीलावर पुढील कारवाई सुरु

बांगलादेशात रवानगी करण्यात आलेला घुसखोर १४ वर्षानंतर बिहारमध्ये सापडला!

राज्यासह देशभरात घुसखोर बांगलादेशी नागरिक सापडत आहेत, पोलिसांची विविध पथके अशा घुसखोर बांगलादेशींना पकडून कारवाई करत आहेत. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या घुसखोरांकडे भारतातील विविध कागदपत्रे सापडली आहेत. काही जण असेही होते, जे भारतात बेकादेशीर १०-२० वर्षे वास्तव्य करत होते. अशा घुसखोरांविरुद्ध कारवाई दरम्यान, बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळ एका बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या घुसखोराला २०११ मध्ये अटक करून त्याची बांगलादेशात रवानगी करण्यात आली होती.

मोल्ला रफी असे घुसखोर बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. २०११ मध्ये बेकादेशीररित्या भारतात शिरकाव केल्यामुळे मोल्ला रफीला अटक करण्यात आली होती आणि मुंबईत ६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा देखील त्याने भोगली होती. यानंतर त्याची कायदेशीररित्या बांगलादेशात रवानगी करण्यात आली.

मात्र, आता पुन्हा तब्बल १४ वर्षानंतर त्याला बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळ पुन्हा अटक करण्यात आली. सुरक्षा दलाने ही कारवाई केली. त्याच्याकडील आधारकार्डही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सुरक्षा दलाकडून पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान, असे असंख्य लोक हद्दपारी होऊनही भारतात पुन्हा प्रवेश करू शकले असतील. अशा गोष्टींमुळे त्यांना आपल्या व्यवस्थेची भीती नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरावर बॉम्बहल्ला आणि गोळीबार!

नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल

अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर; कोणत्या भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम?

कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी!

दरम्यान, २०१२ मध्ये अटक करून बांगलादेशला रवानगी करण्यात आलेल्या दोन घुसखोरांना अजमेरमधून अटक करण्यात आली होती. आलमगीर आणि शाहीन अशी त्यांची नावे असून एसटीएफने ही कारवाई केली होती. हे दोघेही अजमेरच्या दर्गा परिसरात राहत होते.

 

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version