27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामापुन्हा विनयभंग होईल या भीतीने आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी लपली प्राध्यापकाच्या घरात!

पुन्हा विनयभंग होईल या भीतीने आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी लपली प्राध्यापकाच्या घरात!

विद्यार्थिनीला अडवून तिचा छळ करत, तिला विवस्त्र करून तिचे चित्रीकरण केले

Google News Follow

Related

वाराणसीमधील आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीचा तिच्या वस्तीगृहाजवळ पाठलाग करून अज्ञातांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.पुन्हा आपला विनयभंग होऊ नये म्हणून पीडित विद्यार्थिनीने मदत मागत एका प्राध्यापकाच्या घरात प्रवेश करत २० मिनिटे आश्रय घेतला.

विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, वाराणसीमधील आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची ही पीडित विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत वसतिगृहाबाहेर पडली होती. मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवले.त्यांनी तिच्या मैत्रिणीला बाजूला सारून पीडित विद्यार्थिनीला बळजबरीने एका कोपऱ्यात नेट तिची गळचेपी केली.त्यानंतर आरोपीने महिलेला विवस्त्र केले, तिचे चित्रीकरण केले आणि तिचे फोटो क्लिक केले. त्यांनी तिला १५ मिनिटांनंतर जाऊ दिले आणि तिचा फोन नंबर घेतला, असे पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत नमूद केले आहे.

त्यांनतर पीडित विद्यार्थिनीला आरोपीने सोडून दिले.विद्यार्थिनी पुढे जात असताना तिला पुन्हा दुचाकीचा आवाज ऐकू येऊ लागला.ती पुन्हा पकडली जाईल आणि पुन्हा आपल्यावर अत्याचार होईल या भीतीने विद्यार्थिनीने एका प्राध्यापकाच्या घराचा दरवाजा ठोठावला.प्राध्यापकाने दरवाजा उघडताच पीडित विद्यार्थिनीने संपूर्ण घटनेची माहिती देत मदतीची विनंती केली.त्यानंतर प्राध्यापकाने तिला घरात प्रवेश देत २० मिनिटे लपवून ठेवले.प्राध्यापकाने तातडीने संसदेच्या सुरक्षा समितीला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी विद्यार्थिनीला सुरक्षितपणे तिच्या वसतिगृहात परत आणले.

हे ही वाचा:

अब की बार…३२५ पार

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

या घटनेनंतर विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला असून ती वसतिगृहातून बाहेर पडत नसल्याचे सांगण्यात येत आहे.पीडित विद्यार्थिनीसोबत झालेल्या झटापटीत तिची मैत्रीण जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम-३५४ (महिलेवर बळजबरीने केलेला अत्याचार ,हल्ला किंवा गुन्हेगारी)आणि आयटी कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी-बीएचयू कॅम्पसमधील स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये एकत्र येऊन निषेध केला. या घटनेमध्ये बाहेरील घटकांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला व बाहेरील लोकांना कॅम्पसमध्ये प्रवेश बंदी करण्याची त्यांनी मागणी केली.

या प्रकरणी डीसीपी आरएस गौतम म्हणाले, आरोपींचा शोध सुरू आहे.तसेच आयआयटी कॅम्पसच्या सीमा वेगळ्या कराव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.कॅम्पसच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि विजेच्या दिव्यांची पाहणी सुरळीत करावे याची मागणीही त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आरोपींना पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा