धक्कादायक! कल्याणच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

धक्कादायक! कल्याणच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

कल्याण येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग घडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दोन दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे या कोविड सेंटरची सुरुवात करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोविडची परिस्थिती बिकट झाली असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नव्या जम्बो कोविड सेंटरची सुरुवात करण्यात आली. पण सुरु झाल्या नंतर दोनच दिवसात इथे विनयभंगाची घटना घडल्याचे समोर येत आहे. या महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिला कोविडची लागण झाल्याने तिला या सेंटरमध्ये दाखल केले होते. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच तिचा विनयभंग केला आहे.

हे ही वाचा:

अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र

या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते ज्यात त्यानं यश आले आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही महाराष्ट्रातील कोविड सेंटरमध्ये गुप्तांगातून स्वॅब घेणे इथपासून ते बलात्कारापर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोविड सेंटर महिलांसाठी सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Exit mobile version