स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थकांवर धारदार हत्यारांसह हल्ला करणारा मोहम्मद शरीक हाच बेंगळुरू येथील स्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. शनिवारी ही घटना घडली होती त्यात मोहम्मद शरीकसह दोनजण भाजले होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे मोहम्मद शरीकचा संबंध आयसीस या दहशतवादी संघटनेशी आहे.
बेंगळुरूत शनिवारी एक कमी क्षमतेचा स्फोट घडला. त्यावेळी तो कूकर बॉम्ब असल्याचे प्राथमिक वृत्त होते. मोहम्मद शरीक याच्याकडे हा कूकर बॉम्ब होता. तो याचा उपयोग करण्यापूर्वीच त्याच्या हातातच हा कूकर बॉम्ब फुटला आणि त्यात शरीकसह दोन जण भाजून निघाले. शरीक हा कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याचा संबंध इस्लामिक स्टेट तथा आयसीस या कट्टर दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती समोर आली आहे.
It’s confirmed now. The blast is not accidental but an ACT OF TERROR with intention to cause serious damage. Karnataka State Police is probing deep into it along with central agencies. https://t.co/lmalCyq5F3
— DGP KARNATAKA (@DgpKarnataka) November 20, 2022
शरीकवर असे अनेक आरोप आहेत. कट्टर दहशतवाद्यांमध्ये त्याची गणना होते. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो घेऊन जाणाऱ्या समर्थकांवर त्याने धारदार हत्यारांनी हल्ला केला होता. २१ जानेवारी २०२१ला शिवमोगा येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील हा मुख्य़ आरोपी आहे. त्याला जामिन मिळालेला आहे.
हे ही वाचा:
श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली
नवले पुलावर झालेल्या अपघाताचं कारण आलं समोर
‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’
मोदी हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत, आम्ही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही
२०२०मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने मेंगळुरूत भिंतींवर लष्कर ए तोयबा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ चित्र काढण्यात आली होती. त्यातला मुख्य आरोपीही शरीकच होता.
सदर स्फोट जेव्हा झाला तो रिक्षात झाला. त्या रिक्षाचा चालकही यात जखमी झाला आहे. पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी हा स्फोट दहशतवादी कारवाईचा भाग असल्याचे म्हटले होते. मात्र यात रिक्षाचालकाची कोणतीही भूमिका नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.