31 C
Mumbai
Monday, March 24, 2025
घरक्राईमनामानागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

सोशल मीडिया माध्यमातून हिंसाचाराचा कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड

Google News Follow

Related

नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचाराची घटना घडली. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले. ही हिंसा नियोजनपद्धतीने घडवण्यात आणली, असा आरोप केला जात असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंबंधी भाष्य केले आहे. पोलिसांनी अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) स्थानिक नेता फहीम शमीम खान याला या हिंसाचाराचा मास्टरमाइंड म्हणून अटक केली आहे. याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता पोलिसांनी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही अटक केली आहे.

नागपूरच्या महाल भागात सोमवार, १७ मार्च रोजी हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचार पसरवण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पोलिसांना तपासातून आढळून आले. तेव्हापासून पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत. या दिशेने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. याचं पार्श्वभूमीवर हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक करण्यात आली आहे.

हिंसाचाराच्या दिवशी सकाळी हमीद याने मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला विचारले असता, त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सांगितले. हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे. त्यामुळे या दोघांचा नक्कीच संबंध असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, मोहम्मद शहजाद खानने हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याचे वक्तव्य प्रसारित केले होते. यामध्ये, फहीम खान लोकांना एका विशिष्ट धर्माविरुद्ध आणि पोलिसांविरुद्ध भडकावत होता.

नागपूर पोलिस आणि सायबर सेल या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करता येईल. सोशल मीडियावर प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या किंवा भडकाऊ संदेश टाळण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांबद्दल प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले जात आहे.

हे ही वाचा : 

बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव

ट्रम्प यांचा चार देशांमधील स्थलांतरितांना दणका; ५ लाख स्थलांतरित होणार हद्दपार

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांबू पण लावलेत आम्ही…

औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!

नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानसह ५० आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव अधिकृतपणे समाविष्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. आदल्या दिवशी पोलिसांनी त्याचे छायाचित्र आणि हिंसाचार सुरू होण्यापूर्वी खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये तो चिथावणीखोर भाषण देताना दिसत होता. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात त्याने तक्रार पोलिसांकडे केली. यानुसार पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर देखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असे सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा