राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्वाक्षरी करून ‘महावितरण’ विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढणाऱ्या एका खाजगी कंत्राटदाराला सांगलीच्या मिरज मधून अटक करण्यात आली आहे. महंमद इलियास याकूब मोमीन (४०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महंमद इलियास हा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे राहणारा आहे.
खाजगी कंत्राटे घेणाऱ्या महंमद इलियास याला महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्याने अटक केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांचा बनावट ईमेल आय डी तयार करून त्या बोगस ई मेल आयडी वरून राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने आणि त्यांची बनावट स्वाक्षरी करून पत्र पाठविण्यात आले होते, या पत्रात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘आप’चे खासदार संजय सिंग यांना ईडीकडून अटक
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
हे बनावट पत्र असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभाग या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रारी वरून महाराष्ट्र सायबर विभागाने नोडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन सांगली च्या मिरज येथून महंमद इलियास मोमीन याला अटक करण्यात आली आहे. महंमद इलियास याने इंटरनेटचा वापर करून हे पत्र तयार केले होते, मात्र यामागचा त्याचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.