मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

मध्य प्रदेशातील जबलपुरमध्ये लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुस्लीम युवकाने आपली खरी ओळख लपवून हिंदू तरुणीवर बलात्कार केला. हिंदू असल्याचे भासवून या तरुणीची फसवणूक करण्यात आल. पीडित तरुणीने संबंधिताविरोधात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, जबलपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून एका मुस्लीम युवकाने तरुणीला एका मेट्रिमोनियल वेबसाईटवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याने अनेक वेळा तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडितेला लग्नासाठी नकार दिला. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद हुसैन असून त्याने आपली ओळख राहुल असल्याचे पीडितेला सांगितले होते.

याप्रकरणी पीडितेने सांगितले की, सुमारे दीड वर्षांपूर्वी एका मेट्रिमोनियल वेबसाईटवर तिला राहुल नामक युवकाची प्रोफाईल दिसली. त्यानंतर पीडितेने त्याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. एक दिवस राहुल आणि पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये भेटले. तिथे दोघांनी ही एकमेकांना आवड असल्याचे सांगून लग्न करण्याचा विचार दर्शवला. राहुलने २२ सप्टेंबर २०२४ रोजी भेटीसाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलवले होते. तिथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. मात्र, आरोपी काही दिवसांनी लग्नास नाही म्हणाला. तसेच पीडितेवर दबाव टाकून तिला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.

हे ही वाचा..

गेल्या तीन वर्षांत खलिस्तानी प्रचारावर भारताकडून बंदीची कारवाई

‘उपमुख्यमंत्रीपदाच्या बातम्या अफवा, हा तर प्रसारमाध्यमांचा उत्साह !’

जामीन मंजूर होताच दुसऱ्याचं दिवशी मंत्री, हे सगळं काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

पहिलीच पोस्टिंग स्वीकारण्यासाठी निघालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

दरम्यान, पीडितेला कळले की, राहुल नाव सांगणाऱ्या तरुणाची खरी ओळख मोहम्मद हुसैन असे आहे. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लॉर्डगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यानंतर मोहम्मद हुसैनला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर SC\ST आणि बाकी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांनी मेट्रिमोनियल वेबसाईटलाही नोटिस पाठवली आहे. ज्यांनी मोहम्मद हुसैनचे नाव राहुल असे प्रोफाईलवर ठेवले होते.

Exit mobile version