दिल्लीत बनावट ओळख वापरून वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही हे नागरिक आपली ओळख लपवण्यासाठी म्हणून लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून राहत होते. मोहम्मद शकीदुल, मोहम्मद दुलाल अख्तर, मोहम्मद माहिर, मोहम्मद अमीरुल इस्लाम उर्फ मोनिका आणि सद्दाम हुसैन उर्फ रुबीना अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उत्तर-पश्चिम दिल्लीचे डीसीपी भीष्म सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात कारवाई केली. या कारवाई दरम्यान या भागातून पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करण्यात आली. हे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे बांगलादेशातील नागरिक त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी बंदी घातलेल्या आयएमओ अॅपचा वापर करत होते, अशी बाबही उघडकीस आली आहे.
हेही वाचा..
यमुनानगरमध्ये पंतप्रधान करणार थर्मल पॉवर युनिटचे भूमिपूजन
राहुल गांधींच्या संविधानावरील वक्तव्याबद्दल सुधांशु त्रिवेदींनी हाणला टोला
भावाला अडकवण्यासाठी थेट मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!
अटक केल्यानंतर या बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीतून समोर आले आहे की, ते एका एजंटच्या मदतीने सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात आले होते. भारतात आल्यानंतर ओळख पटू नये म्हणून त्यांनी दिल्लीला पोहोचण्यासाठी ट्रेनमधून प्रवास केला. पुढे त्यांनी त्यांचे शारीरिक स्वरूप बदलण्यासाठी शस्त्रक्रिया आणि हार्मोनल थेरपी घेतली. मोहम्मद शकीदुल, मोहम्मद दुलाल अख्तर, मोहम्मद माहिर, मोहम्मद अमीरुल इस्लाम उर्फ मोनिका आणि सद्दाम हुसैन उर्फ रुबीना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दोघांनी त्यांचे स्वरूप बदलण्यासाठी आणि शारीरिकदृष्ट्या महिलांसारखे बनण्यासाठी काही शस्त्रक्रिया केल्या. शिवाय हार्मोन थेरपीसह लिंग बदल उपचार घेतले असल्याचे आढळून आले.