अमेरिकेमध्ये ३१ वर्षीय मॉडेल मेलिना मुनी हिच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मेलिसाचा मृतदेह तिच्याच घरातील फ्रिजमधून हस्तगत करण्यात आला. तिचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत होते.ही घटना लॉस एंजेलिस शहरात घडली. तिचा मृतदेह १२ सप्टेंबर रोजी हस्तगत करण्यात आला. हत्या करण्याआधी या मॉडेलला मारहाणही करण्यात आली होती, असे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. ती दोन महिन्यांची गर्भवतीही होती.
तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हातावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. टॉक्सिकोलॉजीच्या अहवालात तिच्या शरीरात बेंजॉयलेगामनिनसह कोकेथिलीन आणि एथेनॉलचे घटकही आढळले आहेत. तिचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र तिच्या शरीरावरील जखमांवरून असे आढळून आले आहे की, मृत्यूच्या आधी तिला मारहाण करण्यात आली होती.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला
लॉरेन्स बिश्नोईचा २० वर्षीय दुश्मन योगेश कदियानला इंटरपोलची नोटीस
मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी
मेलिसा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा दावा तिच्या बहिणीने केला आहे. तर, मेलिनाच्या आयक्लाऊडवर एक अलर्ट मेसेजही मिळाला होता. त्यानुसार, कोणी तिच्या डिव्हाइसचा वापर करत होते, असे तपासात आढळल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मेलिसाच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली. तिची बहीण जॉर्डिन पॉलिन हीदेखील एक मॉडेल आहे. ‘मी कल्पनाही नाही करू शकत की माझ्या बहिणीवर काय परिस्थिती ओढवली आहे. मला याचा विचार करतानाच दुःख होते,’ असे तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.