बिहारमधील सिवानमध्ये एका मशिदीतून झालेल्या दगडफेकीनंतर तणाव पसरला आहे. या घटनेत उपनिरीक्षकासह १२ जण जखमी झाले. सिवानमध्ये महावीर आखाड्याच्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मशिदीतून अंदाधुंदपणे दगडफेक होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या घटनेत एक पोलीस उपनिरीक्षक, दोन एएसआयसह सहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन पोलिसांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व १२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण सिवान जिल्ह्यातील बधरिया पोलीस स्टेशन परिसरातील जुन्या बाजारपेठेतील आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. एसपी शैलेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या घटनेत महाविरीच्या मिरवणुकीच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. बरहरिया पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रवीण कुमार प्रभाकर यांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गावात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
असाच एक हल्ला पटना येथे पोलिसांवर झाला आहे. काही लोक शस्त्रास्त्र घेऊन येणार असल्याची खबर मिळताच पोलिस तिथे पोहोचले पण तिथे कुणीही आढळले नाही. मात्र चार जण पोलिसांना पाहून पळू लागताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. तेव्हा याची माहिती पसरल्यानंतर लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यांना काठ्यांना मारहाण केली. त्यात पोलिस गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा:
डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय
गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण
आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भविष्यात आणखी लोकांना अटक होऊ शकते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात इस्लामी लोक मशिदीच्या वरच्या मजल्यावरून मिरवणुकीवर दगडफेक करताना दिसत आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
दगडफेकीत महिलांचाही सहभाग
व्हिडिओमध्ये लोक मशिदीतून विटा आणि दगड फेकताना दिसत आहेत. इतकंच नाही तर आजूबाजूच्या घरातूनही महिला दगडफेक करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई तीव्र केली आहे. सध्या १० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. त्यात दोन्ही समाजातील लोकांचा समावेश आहे.