अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील उज्जैनी गावातील घटना

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.उज्जैनी गावातून १० टनांपेक्षा जास्त वजनाचा ५० मीटर उंच मोबाईल टॉवर चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे एका तंत्रज्ञाने बुधवारी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र ३१ मार्च रोजी टॉवर बेपत्ता झाल्याचे त्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम ३७९ (चोरी) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.बिहारमध्ये ६० फूट लांबीचा लोखंडी पूल चोरीला गेल्याच्या वर्षानंतर ही घटना घडली आहे.

तंत्रज्ञ राजेश कुमार यादव यांनी ही तक्रार दाखल केली.यादव यांच्या तक्रारीनुसार, केवळ टॉवरच नाही तर मोबाईल टॉवर,एक निवारा, इलेक्ट्रिकल फिटिंग व इतर उपकरणेही गायब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीला गेलेल्या मोबाईल टॉवरच्या साहित्यांची किंमत साडेआठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा:

विजेचे बिल होते चार हजार रुपये; जमा झाले १९७ कोटी!

हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!

‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’

राजस्थान, मध्य प्रदेशात भाजप; तेलंगणात बीआरएसपेक्षा काँग्रेस सरस

संदीपान घाट पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून जमीन मालक व स्थानिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.तंत्रज्ञ राजेश कुमार यादव यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीने या वर्षी जानेवारी महिन्यात कौशांबी जिल्ह्यातील उज्जैनी गावात उबिद उल्लाह यांच्या शेतात टॉवर बसवला होता. यादव म्हणाले की, ३१ मार्च २०२३ रोजी त्यांनी पाहणीसाठी साइटला भेट दिली तेव्हा संपूर्ण टॉवरसह इतर वस्तू गायब होत्या.

 

 

Exit mobile version