मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन मधील घटनेचा व्हीडिओ सध्या बराच व्हायरल झाला असून त्यात मोबाईल चोरट्यांना विवस्त्र करून मारहाण करताना काही लोक दिसत आहेत. मुंबईतील उपनगरीय ट्रेन मध्ये शूट केलेले व्हिडीओ मागील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
नुकताच एका वकील तरुणीचा असाच एक रेल्वेतील व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ती तरुण समोरच्या सीटवर पाय ठेवून बसलेली आहे आणि ती पाय खाली घेणार नाही असे सांगत व्हीडिओ काढणाऱ्याशी वाद घालत आहे. हा व्हीडिओ पाहून लोकांनी त्या तरुणीच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांची संसदेत पोस्टरबाजी
राहुल गांधी यांचा आटापीटा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी संबंध जोडण्याचा प्रयत्न
मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
या पाठोपाठ मंगळवारी सकाळपासून सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ आहे मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते बदलापूर या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमधील आहे. धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरट्याना प्रवाशानी पकडून त्यांना चांगलाच चोप देत त्यांना धावत्या ट्रेनमध्येच विवस्त्र केले. मात्र या संशयित चोरट्यांचे पुढे काय झाले याबाबत मात्र रेल्वे पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त यांनी या व्हिडीओ सत्यता तपासण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले आहे. काही वर्षांपूर्वी अशीच मोबाईल चोराला बेदम मारहाण रेल्वेत करण्यात आली होती. दोन मोबाईल चोरांना रेल्वेत दोन तरुणांनी मारहाण केली होती. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली होती.