24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाइथून जातात मुंबईकरांचे मोबाईल फोन पाकिस्तानात

इथून जातात मुंबईकरांचे मोबाईल फोन पाकिस्तानात

Google News Follow

Related

रेल्वे प्रवासी तसेच पादचारी यांचे चोरीला गेलेले मोबाईलची पाकिस्तानमध्ये तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. मुंबई तसेच ठाणे नवी मुंबई येथून चोरलेले मोबाईल हे बांगलादेश मार्फत पाकिस्तानमध्ये पाठविण्यात येत आहे, यासाठी मोठे सिंडिकेट काम करीत असून अंडरवर्ल्ड देखील या मोबाईल चोरीमध्ये सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ६ तसेच मानखुर्द, शिवाजी नगर आणि ट्रॉम्बे पोलिसांनी मागील महिण्यात चोरीचे मोबाईल विकत घेणारी, तसेच मोबाईल चोरांच्या वेगवेगळ्या टोळ्याना अटक केली होती. या टोळीजवळून जवळपास हजार मोबाईल जप्त करण्यात आले होते, त्यात आयफोन पासून इतर महागड्या स्मार्ट फोनचा समावेश आहे. मुंबईतून चोरलेले मोबाईल विकत घेणाऱ्या टोळ्या पूर्व उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द आणि ट्रॉम्बे या ठिकाणी झोपड्यामध्ये कार्यरत असल्याचे पोलिसांच्या कारवाइतुन समोर आले होते.

मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये या टोळ्या मोबाईल रिपेअरिंगच्या नावाखाली छोटेखानी दुकाने थाटून चोरीचे मोबाईल फोन विकत घेत होती. त्यानंतर मोबाईल फोनचे आयएमआय क्रमांक बदलून हे मोबाईल कुरिअर कंपनी अथवा खाजगी ट्रॅव्हल्स बस मधून उत्तर प्रदेश, झारखंड, नेपाळ, बांगलादेशात पाठवत होते. मुंबईतून हजारोंच्या संख्येने हे सर्व मोबाईल परराज्यात तसेच नेपाळ, बांगलादेश येथे पाठवले जात होते.

नेपाळ आणि बांगलादेशातुन हे मोबाईल फोन पाकिस्तानात पाठवले जात असल्याची माहिती समोर आली असून त्या अनुषंगाने मुंबई गुन्हे शाखा तपास करीत आहे. मोबाईल चोरी पासून विकत घेणारे तसेच त्याची तस्करी करणाऱ्यांचे मोठे सिंडिकेट असून या सिंडिकेट मध्ये शेकडो जण काम करीत आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश येथून हे मोबाईल पाकिस्तानमध्ये पोहचविण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

तपास यंत्रणेला असा संशय आहे की, पाकिस्तान मध्ये पाठवले जाणाऱ्या मोबाईल फोन तस्करीच्या डी- कंपनीचा समावेश आहे. पाकिस्तान मधून हे चोरीचे मोबाईल फोन दहशतवादी संघटनाना पाठवण्यात येत असून त्या मोबाईलचा वापर दशतवादी कृत्य करण्यासाठी वापरला जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

ट्रेन मध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीचे गुन्हे

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईल फोन्सची सर्वाधिक चोऱ्या होत आहे. दररोज उपनगरीय ट्रेनमध्ये जवळपास २००मोबाईल फोन्स चोरीला जातात तर शहरात देखील जवळपास १०० मोबाईल चोरी,गहाळ होण्याच्या घटना घडत आहे. मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत असून चोरलेले मोबाईल फोन्स विकत घेणारे देखील वाढले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा