मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एका ‘डी.जे. स्नेक’ कार्यक्रमात मोबाईल चोरांची चंगळ झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात ७५ ते ८० जणांचे मोबाईल फोन चोरट्यानी लांबवले आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला अटक करून त्याच्याजवळून १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
डीजे स्नेकच्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या ‘फ्रेंच विलीयम एथिनी’ हा जगातील प्रसिद्ध डीजे आहे. डीजे स्नेकचा सध्या भारत दौरा सुरू असून शनिवारी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात डीजे स्नेकचा कार्यक्रम पार पडला. ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर हजारोच्या संख्येने चाहत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमाचे मैदान खचाखच भरले होते. असे बीकेसी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यक्रमात चोरट्यानी देखील ऑनलाइन तिकीट मिळवून प्रवेश मिळवला होता.
कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांना आपले मोबाईल फोन मिळून न आल्यामुळे त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्याच्या बाहेर तक्रारी देण्यासाठी गर्दी केली होती. बीकेसी पोलिसांनी रविवारी सकाळ पर्यत मोबाईल चोरीचे गुन्हे तसेच हरवल्याची तक्रारी दाखल करण्यात व्यस्त होते.
हे ही वाचा :
सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राहुल गांधींची! गुळगुळीत मेंदूचा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
बीकेसी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळ पर्यत ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सुमारे ७५ ते ८० मोबाईल फोन्स चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच अनेकांनी गुन्हा दाखल न करता मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान बीकेसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५ मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहे. इतर मोबाईल फोन चोरांचा कसून शोध घेतला जात आहे.