लालबागला गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये चोरांचा विळखा

शेकडो मोबाईल आणि सोनसाखळ्याची चोरी

लालबागला गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये चोरांचा विळखा

मोबाईल आणि सोनसाखळी चोरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत धुमाकूळ घालत शेकडो मोबाईल आणि सोनसाखळ्या लांबवल्याच्या तक्रारी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. एकट्या लालबागमध्ये चोरट्यांनी ५० पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि २० पेक्षा अधिक सोनसाखळ्या चोरल्याचे समोर आले आहे. या टोळ्या मुंबईतील नसून मुंबई बाहेरून आलेल्या टोळ्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तसेच वृत्तवाहिन्यांच्या कॅमेराच्या फुटेजची मदत घेतली जात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानी दिली आहे.

अनंत चतुर्थीचा मुहुर्त साधत परराज्यातून आलेल्या मोबाईल चोराच्या टोळ्यांनी शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकांना आपले लक्ष्य केले. या टोळ्यांनी लालबाग, परळ, गिरगाव सह पूर्व – पश्चिम उपनगर, उत्तर मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकाच्या गर्दीत मिसळून अनेकांचे मोबाईल फोन आणि सोनसाखळ्या लांबवल्या. एकट्या लालबाग परिसरातून या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोनसाखळी चोरी केल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी दुपारपासून काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. शनिवारी दुपारपर्यंत काळाचौकी पोलीस ठाण्यात ५० पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि २० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

हे ही वाचा:

नरबळीसाठी नांदेडमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा संशय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांच्या भेटीचे फोटो कंगनाने केले शेअर

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

सामनाच सांगतोय, संजय राऊत हा विषय संपला…

या टोळ्यांनी केवळ लालबागच्या हद्दीतच नाही तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेली त्या ठिकाणी देखील चोरीच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गिरगाव चौपाटी या ठिकाणी देखील अनेकांचे मोबाईल फोन सोनसाखळ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी. बी.मार्ग पोलीस ठाण्यात देखील चोरीच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजी पार्क, दादर, माहीम,सांताक्रूझ, मालवणी,वर्सोवा या ठिकाणी देखील चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.

Exit mobile version