महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मोडतोड केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत.
याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी जळगावकरचा दौरा करून सरळ समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जात असताना मध्यरात्री नंतर म्हणजे रविवारी पहाटेच्या सुमारास सर्वसाधारण दीड ते दोनच्या आसपास ते समृद्धी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील टोल नाक्यावरती आले असताना त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोल मागितला. त्यांनी कायदेशीर तो टोल दिला देखील आणि ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
हे ही वाचा:
इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा
रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह
खेड तालुक्यातील २८ गावांमधील ४४ वाड्या डेंजर झोनमध्ये
मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढणाऱ्या पाचव्या आरोपीस अटक !
दरम्यान, या घटनेची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे गोंदे टोलनाका येथे गेले आणि त्या ठिकाणी ते विचारपूस करत असताना गोंदे टोलनाकाच्या कर्मचाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांशी वाद घातला आणि अरेरावीची भाषा केल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वाडीवरे व इगतपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत मनसे कार्यकर्ते तोडफोड करून हे निघून गेले होते. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, सव्वानऊला अमित ठाकरे समृद्धी महामार्गावरून इथे आले तेव्हा त्यांचा फास्टटॅग ब्लॅकलिस्टेड आढळला. टोलनाक्याच्या कर्मचाऱ्याला त्या गाडीत अमित ठाकरे असल्याचे माहीत नव्हते. त्या तांत्रिक बाबी पूर्ण ३ मिनिटांचा अवधी गेला त्यामुळे मनसैनिक नाराज झाले. १० वाजण्याच्या सुमारास एकत्र आले. कार्यकर्ते पोलिस दल आले. कार्यकर्त्यांची समजूत काढली. चूक लक्षात आणून दिली. टोलनाक्याचे मॅनेजर यांनी दिलगिरी व्यक्ती केली. कार्यकर्ते शांततेत निघून गेले. दोन अडीच तास होतो. पण रात्री दोन नंतर काही बाहेरील मनसेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. तक्रार आलेली नाही. पण आम्ही ती नोंदवून घेत आहोत आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे.