बलात्कार केल्याचा मनसे विभागाध्यक्षावर गुन्हा आणि अटक

बलात्कार केल्याचा मनसे विभागाध्यक्षावर गुन्हा आणि अटक

महानगर पालिकेचे निवडणुकीचे तिकीट देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी मनसेचे विभागअध्यक्षाला अटक केली आहे.

४२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत हि कारवाई केली आहे. या विभागअध्यक्षाने या महिलेला पद देण्याचेही आश्वासन दिले होते.

वृषांत वडके असे अटक करण्यात आलेल्या  गिरगाव परिसरातील मनसे विभागाध्यक्षाचे नाव आहे. त्याने या विवाहित महिलेला उपरोक्त आश्वासन दिले होते. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत वडके याने ४२ वर्षीय महिलेला मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले होते आणि तिला वेगवगेळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला व या गोष्टीची कुठेही वाच्यता केल्यास बघून घेऊ अशी धमकी दिली होती, असे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

बंगळुरूचा डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी ३ किलोमीटर धावला

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे, ताटातले वाटीत…

‘एसटीची अमृत योजना’ जेष्ठांच्या आवडीची

जयंतराव, तेव्हा कुठे गेले ‘संकेत’ ?

 

सोमवारी या महिलेने व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  केली असता पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनसे विभागध्यक्ष वृषान्त वडके याला रात्री अटक करण्यात आली आहे. या तक्रारदार महिलेने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर वडके याची विभागाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Exit mobile version