मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नंतर झपाट्याने घडामोडी घडत आहेत. या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेलेल्या आरोपीचे नाव अशोक खरात असे आहे. हा आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.
खरात याला भांडुपच्या कोकण नगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलं संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यापासून ठाकरे गटावर संशय व्यक्त करण्यात येत होता. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. खरात याने काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. खरात याचे शिवसेनेच्या नेत्यांसमवेतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टिकेमुळेच हा हल्ला केल्याची कबुली आरोपाने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. खरात याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव सोळंकी असून तो त्याचा सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक खरात हा भांडुप कोकण नगरमध्ये राहतो. त्यामुळे आता संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याला नवे वळण लागले आहे . पोलीस आता इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त
गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
खरात हे ज्या माथाडी जागर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्या संघटनेचे अध्यक्ष आप्पा कराडकर आहेत. कराडकर यांच्या नाववरही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचा तपास पोलिस करत आहेत. मनसे संघटनेने खरात यांच्या अटकेनंतर आता या हल्ल्याच्या मागच्या मास्टरमाईंडला ताब्यात घ्या अशी मागणी केली आहे.