पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून काही दिवसांपूर्वी देशभरात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होतं. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात एल्गार केला आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेला आता मनसेकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन सुरू आहे. ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध देखील करण्यात आला आहे.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेनेनंतर रशियाही भारताच्या पाठीशी
एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
ठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
गुरूवारी, राष्ट्रीय तपास संस्थेने PFI च्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकून १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याच्या व्हिडीओ समोर आले आहेत. PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली असून भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFI चं लक्ष्य असल्याचं ATS च्या तपासातून समोर आलं आहे.