मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे दोन आरोपी लक्ष्मी चिराग नगर येथे राहत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. आता त्याचेच सीसीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. देशपांडे यांच्यावर हल्ल्या करणारे हे ठाण्यातल्या लक्ष्मी चिराग नगर इथे मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या शोधात पोचले. त्यांना या ठिकाणी ते दोघे संशयित राहत असल्याची माहिती ठाण्यातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. म्हणूंनच आरोपींना शोधण्यासाठी मनसेचे पदाधिकारी ठाणे येथे पोचले आहेत. मनसेचे पालघर जिल्याध्यक्ष अविनाश जाधव हे आपल्या अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते, यांनी हल्लेखोरांच्या घराची पाहणी केली आहे. पण त्यावेळेस हल्लेखोर घरात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा त्यांना अटक केल्याची माहिती मिळाली. पण यातील एक आरोपी हा फरार असून त्याचा शोध लवकर घ्यावा अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
आरोपी कोण आहेत?
सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून, अशोक खरात, आणि किसन सोळंकी अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. शिवाय सीसीटीव्हीमध्ये दिसणारा मुख्य आरोपी हा अशोक खरातच असून त्याच्यावर याआधीही मोक्का सुद्धा लावण्यात आला आहे. अशोक खरात याच्यावर डोंबिवलीमध्ये हत्या आणि ठाण्यामध्ये खंडणीच्या गुन्हयात गुन्ह्यांची नोंद केली आहे. मुख्य म्हणजे सीसीसीटीव्ही मध्ये हे स्पष्ट दिसत आहे कि, अशोक खरात याच्या हातात स्टंप असून तो हातातील स्टंप हे एका गाडीजवळ ठेवून पुढे गेला आहे. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई आणि संजय राऊत यांचे नाव स्पष्ट घेतले आहे. याशिवाय अशोक खरात आणि वरुण सरदेसाई यांचे संबंध असणारे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
याव्यतिरिक्त संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याबरोबरसुद्धा काही फोटो व्हायरल झाले आहेत. संदीप देशपांडे यांनी जेव्हा काल शनिवारी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी हेच फोटो दाखवले. मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील घोटाळे उघड केल्यामुळेच हा हल्ला केल्याचा आरोप देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत घेतला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी हा हल्ला झाला का करवून घेतला यावरच शंका उपस्थित केली आहे. देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे आला आहे. त्यामुळे यात आता मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न पडून हा हल्ला कोणत्या हेतूने होता हे उघड करणे आता या तपास अधिकाऱ्यांसमोर आव्हान
संजय राऊत यांनी काय म्हटले?
संदीप देशपांडेंचा रोख वरुण सरदेसाईंबरोबरच संजय राऊतांवर आहे. तर राऊतांनी हल्ला झाला की करवून घेतला म्हणत हल्ल्यावर शंका उपस्थित केलीय. देशपांडेंवरील हल्ल्याचा तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे आलाय. त्यामुळं मास्टरमाईंड कोण? आणि हल्ल्याचा हेतू काय होता, हे उघडकीस आणण्याचं आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर असेल.