महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी दादर परिसरात जात असताना हा हल्ला त्यांच्यावर करण्यात आला.
हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि स्टम्प्सच्या सहाय्याने देशपांडे यांच्यावर हल्ला केला. हल्ला करून हे हल्लेखोर पळून गेले. त्यांचे चेहरे झाकलेले होते. या हल्ल्यानंतर देशपांडे यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले.
मनसेच्या नेत्यावर करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात हे आता पाहायचे.
हे ही वाचा:
हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…
दोघे गुजरातवरून आले आणि शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत ओलांडली
कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?
शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आलेले असताना चारजण त्यांच्यादिशेने आले आणि त्यांनी रॉड आणि स्टम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक हा हल्ला झाल्यामुळे देशपांडे प्रतिकार करू शकले नाहीत. ते जखमी होऊन खाली कोसळले. तेथील लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे हे हल्लेखोर पळून गेले. त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र दुखापत गंभीर नसल्याने त्यांना उपचार करून घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
यासंदर्भात माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी सांगितले की, हा भ्याड हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांनी तयारी केली असल्याचे लक्षात येते. कारण एरवी देशपांडे यांच्यासोबत कुणीतरी मॉर्निंग वॉकला असतात. पण यावेळी ते एकटेच असल्यामुळे कदाचित हल्लेखोरांना संधी मिळाली. यामागे कोण आहे हे आताच सांगता येणे कठीण आहे.
याबाबत पोलिसांनी म्हटले आहे की, हल्ला झाला आहे पण ते सुरक्षित आहेत. पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत. हाताला आणि पायाला दुखापत आहे, फार गंभीर दुखापत नाही.