मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरात तसेच मुंब्रा बायपास जवळील डोंगरावर असलेल्या अनधिकृत दर्गा संदर्भात ठाणे महानगर पालिकेला केलेल्या पत्रव्यवहार तसेच १५ दिवसांचे अल्टीमेंट दिले होते. त्या प्रकरणात आता त्यांना मुंब्र्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
या संदर्भात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी अविनाश जाधव यांना मुंब्रामध्ये बंदी आणली असून त्यांना या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.
दंडाधिकाऱ्यांनी जाधव यांना २७ मार्चला पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, २३ मार्चपासून रमझान महिना सुरू झाला असून मुंब्रा बायपास लगत असणाऱ्या दर्गा, मजार, मशिदीवर कारवाई करावी अशी मागणी करून ती केली गेली नाही तर १५ दिवसांत आपण त्या दर्गाशेजारी हनुमान मंदिर बांधू असे वक्तव्य सोशल मीडियावर केले आहे.
हे ही वाचा:
सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू
उद्धव ठाकरेंना सहन होत नाही… मग करणार काय?
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
राम सेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा!
मुंब्रा हे अतिसंवेदनशील आहे. याचदरम्यान रमझान सुरू असल्यामुळे या वक्तव्याचा परिणाम होऊन शांततेचा भंग होऊ शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक शांततेत बाधा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने कायद्याचे कलम १४४नुसार आपणास मुंब्रा पोलिस ठाणच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
हा आदेश २७ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीसाठी असेल. त्या काळात या पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुम्हाला येता येणार नाही. त्या आदेशाचा भंग केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मुंबईत माहीम येथे अशीच एक मजार गेली अनेक वर्षे समुद्रात होती, त्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात माहिती दिली होती. त्याचा व्हीडिओ व्हायरल करून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. ती कारवाई न झाल्यास आपण महिन्याभरानंतर तिथे गणेश मंदिर उभारू असा इशाराही दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही मजार पालिकेने हटविली होती. त्यानंतर अशा मजारी, दर्गे यांच्याविरोधात आवाज उठण्यास प्रारंभ झाला होता.