कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदार विवेक पाटील अटकेत

कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदार विवेक पाटील अटकेत

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाी बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणांमुळे ठेवीदार संकटात सापडल्याचा संताप लोकांकडून व्यक्त होत होता. या कारवाई दरम्यान विवेक पाटील यांच्या घराचीही झाडाझडती ईडीने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

रायगड जिल्ह्यातील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक‘ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी आमदार विवेकानंद पाटील यांना पनवेल येथून मंगळवारी रात्री अटक केली. या प्रकरणातील ५१२ कोटी रुपयांच्या कथित मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती ‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हे ही वाचा :
तीन दिवसात ४७ लाख लसी राज्यांना मिळणार

विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे

एरिक्सन पुन्हा उभा राहतोय! चाहत्यांचे मानले आभार

शिक्षकांनो १००% उपस्थिती हवी, पण शाळेत जायचे बस, टॅक्सीने!

कर्नाळा बँकेत कोट्यावधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांनी आंदोनही केले होते. यावेळी पनवेलमधील स्थानिक आमदाराने याप्रकरणात ईडीला पुरावे सादर केले होते.

रात्री ९ च्या सुमारास विवेक पाटील यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. १०० कोटींपेक्षा अधिक घोटाळा असल्याने ईडीने यात हस्तक्षेप केला. या घोटाळ्यामुळे बँक डबघाईस आली. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२०ला पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Exit mobile version