मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अडचणील वाढ झाली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वतः आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
फॉक्सकॉन प्रकरणी नव्या सरकारवर टीका कशाला?
आरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहण्यास सांगणारा अधिकारी निलंबित
महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.