25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाउल्लू, गुपचुपवर कारवाई करा!

उल्लू, गुपचुपवर कारवाई करा!

Google News Follow

Related

भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लिल वेबसाईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणुकीची धक्कादायक माहिती उघड होते आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी आणि ज्या आघाडीच्या कंपन्यांची नावे घेतली जात आहेत अशा उल्लू, गुपचुपसारख्या अनेक ऍपवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार शेलार यांनी म्हटले आहे की, राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे १ अश्लिल अ‍ॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केले गेले जात आहेत. अशा ४० हून अधिक बेकायदेशीर अश्लील ऍप्स आणि वेबसाइट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोर वयीन मुलांवर विपरित परिणाम होत असून त्यांना नकारात्मकतेने घेरले आहे.

चाइल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत २०१९ पासून १५ हजारपेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आणि २१३ एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन २०१७ पासून २०१९ पर्यंत पॉक्सो प्रकरणात ४५% वाढ झाली आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असेही आमदार शेलार यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

काय केंद्र केंद्र म्हणताय? राज्याचा बजेट चार साडेचार लाख कोटींचं आहे

…आणि रेल्वेमंत्र्यांनीच ट्विट बघून केली कारवाई

…म्हणून मीराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत पिझ्झा

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

तर मोठ्या फिल्म प्रॉडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लिल चित्रपट सामग्री तयार करतात. (Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov ही त्यातील आघाडीची नावे घेतली जात आहेत.) म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लिल ओटीटी ऍप्स आणि वेबसाइट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व ऍप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असेही ऍड. शेलार यांनी नमूद केले आहे.

नागरिकांना अशी सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाइल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडल देण्यात यावे. तसेच सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा, गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लिलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा,अशा मागण्या आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा