मुंबईत उलट्या मार्गावरून वाहन चालवणाऱ्यांची विशेषतः दुचाकी स्वारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये दररोज सुमारे १३० दुचाकीस्वारांना उलट्या मार्गावरून वाहन चालवल्यामुळे पकडण्यात आले आहे. तरीही वाहन चालक उलट्या मार्गावरून वाहने चालवत असतात त्यामुळे अपघातांची शक्यता असते. मुंबई उच्च न्यायालयाजवळ उलट मार्गावरून वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे एका वकिलाने मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आणि मुंबई पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
रस्त्यावर मार्गदर्शक खुणा नसल्यामुळे किंवा त्या स्पष्ट नसल्यामुळे अनेक वाहनचालक चुकीच्या मार्गावर वाहने चालवत असतात. नानिक मोटवानी मार्गावर (वन- वे) एका दुचाकीस्वाराला उलट्या बाजूने प्रवेश केला म्हणून रोखले असता त्याने मार्गाच्या प्रवेशावर वन-वे दर्शवणारे कोणतेही चिन्ह किंवा सूचना नसल्याचे सांगितले. स्वतः जाऊन तपासले असता खरच तिथे कोणत्याही सूचना नव्हत्या, असे वकील अरमीन वांद्रेवाला यांनी सांगितले. त्यांनी ई- मेलमध्ये गहाळ झालेल्या बोर्डकडेही लक्ष देण्यात यावे, असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग
अफगाणिस्तान सीमेवर आत्मघातकी हल्लेखोर तैनात
शाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?
दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर करण्याच्या नियमामुळे शिक्षक वैतागले
कुलाबाच्या स्ट्रॅन्ड रोड इथे वन- वे दर्शवणारा बोर्ड आहे, पण तो एक झाडाच्या मागे लपल्यामुळे पटकन दिसून येत नाही. त्यामुळे या मार्गावर रोज नियमांचे उल्लंघन होत असते. दुचाकीस्वार जास्त नियम मोडत असतात. कुलाबा कॉजवेजवळ चार वन- वे आहेत. चुकीच्या दिशेने येणारी वाहनेसुध्दा वेगाने येत असतात तिथे काही ठिकाणी गतिरोधक बांधणे अत्यंत आवश्यक आहे, असे क्लीन हेरीटेज कुलाबा रहिवासी संघाचे सुभाष मोटवानी यांनी सांगितले.
जानेवारी ते ऑगस्ट (२०२१) या महिन्यांमध्ये सुमारे ४७ हजार ५०० वाहन चालकांवर चुकीच्या मार्गावरून वाहन चालवल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे. ही संख्या संपूर्ण २०२० वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. २०२० मध्ये सुमारे ३१ हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती.