रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणी संशयित म्हणून उपतालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही यात समावेश आहे. स्वप्नाली सावंत यांचे पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कट कारस्थान करून १ सप्टेंबर रोजी या तिघांनी स्वप्नाली यांना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती पोलीस तपासात पुढे अली आहे.
रत्नागिरी पोलिसांनी काहीही माहिती नसताना आठ दिवस कसून तपास सुरु ठेवला होता. तसेच त्यांनी सतत गेले तीन दिवस मिऱ्या बंदर येथे जाऊन तपास केला. डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. जाळून मारल्यानंतर ही राख या संशयित आरोपींनी समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, मिऱ्या येथील भाई सावंत यांच्या घरा जवळून पोलिसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्याचा आरोप रत्नागिरी शहर पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, स्वप्नाली सावंत या दिनांक १ सप्टेंबर पासून त्यांच्या मिऱ्या येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती.
हे ही वाचा:
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
कोकण विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघामारे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी पोलिसांच्या पथकाने या तपासात मेहनत घेतली आहे.